Saturday, December 21, 2024
No menu items!

जिल्हा परिषदेच्या विविध पदाची सरळसेवेने भरती -जिल्हाधिकारी गोविंद बोडके

पालघर दि. 04 : (जिमाका) जिल्हा परिषदेच्या विविध पदाच्या 991 जागांसाठी सरळसेवेने भरती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी दि. 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.

. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जिल्हा परिषदेच्या पद भरती संदर्भात माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपस्थित होते. जिल्हा परिषद पालघरच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. 01/2023 दिनांक 05/08/2023 अन्वये प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद, पालघर च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. जाहिरात क्र. 01/2023 नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 05/08/2023 पासून ते दिनांक 25/08/2023 रोजी पर्यत आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या लिंकवर दिनांक 25/08/2023 रोजीचे रात्री 23:59 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद पालघर च्या https://www.zppalghar.gov.in या लिंकवर उपलब्ध आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular